पणजीत निषेध सभेत भाजपाचे प्रवक्ते दामू नाईक यांचा इशारा
वार्ताहर/ पणजी
पाकिस्तान भारताविरूध्द हीन पातळीवर आरोप करीत आहे. भारतीय नागरिक हे कदापी सहन करणार नाहीत. म्यानमार येथे झालेल्या संघर्षात भारतीय जवानांनी पाकिस्तानी सैन्याला पिटाळून लावले आहे. शांततेची भूमिका घेणाऱया भारतीय सैन्याला पाकिस्तानने चिथावू नये, असा इशारा भाजपाचे प्रवक्ते दामू नाईक यांनी दिला.
पाकिस्तानचे परराष्ट्र व्यवहार मंत्री बिलावल भूत्तो यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात घृणास्पद वक्तव्य केल्यामुळे देशात संतापाची लाट पसरली आहे. भुत्तो यांचा निषेध करण्यासाठी भाजपा गोवा प्रदेश युवामोर्चातफ्xढ पणजीत आयोजित निषेध सभेत नाईक बोलत होते.
सभेला भाजपाचे गोवा प्रदेश अध्यक्ष सदानंद शेट तानावडे, आमदार दाजी साळकर, संकल्प आमोणकर, माजी खासदार नरेंद्र सावईकर, माजी आमदार सिद्धार्थ कुंकळकर, युवामोर्चा अध्यक्ष समीर मांद्रेsकर उपस्थित होते.
यावेळी उप†िस्थत कार्यकर्त्यांनी पाकिस्तान व चिन भारताविरूध्द करत असलेल्या कारवायाचा निषेध केला. सभेनंतर पाकिस्तानचे परराष्ट्र व्यवहार मंत्री बिलावल भुत्तो यांच्या पुतळ्याचे दहन केले. यावेळी भारतमाता की जय घोषणांनी परिसर दणाणून सोडला.









