ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ (shehbaz sharif) यांच्या मंत्रिमंडळाचा शपथविधी (cabinet takes oath) आज पार पाडला. शाहबाज शरीफ यांच्या मंत्रिमंडळातील एकूण 34 मंत्र्यांना सिनेटचे सभापती सादिक संजरानी यांनी पद आणि गोपनियतेची शपथ दिली. 31 जणांना कॅबिनेट तर 3 जणांना राज्यमंत्री म्हणून शपथ देण्यात आली. शरीफ यांच्या पीएमएल-एन या पक्षाच्या 14 जणांना मंत्रिपद मिळालं. तर, पीपीपीच्या 9 जणांना, जेयूआयच्या 4, एमक्यूएम 2 आणि बाप आणि जम्हूर वतन पार्टीला 1 मंत्रिपद देण्यात आलं.
पीएमएल-एनच्या खासदार ख्वाजा आसिफ, अहसान इक्बाल, राणा सनाउल्लाह, अयाज सादिक, राणा तन्वीर, खुर्रम दस्तगीर, साद रफिक, मियाँ जावेद लतीफ, मियाँ रियाज पिरजादा, मुर्तजा जावेद अब्बासी, आझम नजीर, मरियम औरंगजेब आणि मिफ्ता इस्माईल यांना मंत्रिमंडळात स्थान मिळाले आहे. पीपीपीमधील खुर्शीद शहा, नवीद कमर, शेरी रेहमान, अब्दुल कादिर पटेल, शाझिया मारी, मुर्तजा महमूद, साजिद हुसेन तोरी, एहसान-युवर-रेहमान आणि आबिद हुसेन यांनीही मंत्रिमंडळात स्थान मिळवले.
जुई-एफचे असद महमूद, अब्दुल वासे, मुफ्ती अब्दुल शकूर, तल्हा महमूद आणि एमक्मयूएम-पीचे सय्यद अमीनुल हक आणि फैसल सबजवारी ह देखील मंत्रिमंडळात सहभागी आहेत. मंत्रिमंडळात बीएपीचे इसरार तारिन, जेडब्ल्यूपीचे शहझेन बुगती आणि पीएमएल-क्मयूचे तारिक बशीर चीमा यांचाही समावेश आहे. पीएमएल-एनचे आमिर मुकम, पीपीपीचे कमर जमान कैरा आणि जहांगीर तारीन ग्रुपचे औन चौधरी यांना पंतप्रधानांचे सल्लागार बनवण्यात आले आहे. आयेशा घोष पाशा, अब्दुल रहमान कांजो आणि हिना रब्बानी खार हे नव्या मंत्रिमंडळात राज्यमंत्री आहेत.