वृत्तसंस्था/ इस्लामाबाद
पाकिस्तान पुन्हा एकदा भूकंपाने हादरला आहे. नॅशनल सेंटर फॉर सिस्मोलॉजीनुसार, सोमवारी पाकिस्तानात 4.7 रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपामुळे अनेक घरांचे मोठे नुकसान झाले. तथापि, कोणत्याही ठिकाणी जीवितहानी झाल्याचे अधिकृत वृत्त जारी करण्यात आलेले नाही. सोमवारी सकाळी सव्वाअकरा वाजण्याच्या सुमारास जाणवलेल्या या हादऱ्यांमुळे लोक भयभीत होऊन घराबाहेर पडले. हा भूकंप 10 कि.मी. खोलीवर झाल्यामुळे नजीकच्या काळात आणखी धक्के बसण्याचा इशारा देऊन लोकांना सतर्क करण्यात आले आहे. पाकिस्तानमध्ये भूकंपाचा हा सलग तिसरा दिवस होता. यापूर्वी शनिवारी आणि रविवारीही येथे 4.0 रिश्टर स्केलचे भूकंप जाणवले होते.









