सौद शकील, बाबर आझम यांची अर्धशतके
वृत्तसंस्था / सेंच्युरियन
द. आफ्रिका आणि पाक यांच्यात येथे सुरू असलेल्या पहिल्या क्रिकेट कसोटीत शनिवारी खेळाच्या तिसऱ्या दिवशी चहापानापर्यंत पाकने दुसऱ्या डावात 8 बाद 212 धावा जमवित एकूण 122 धावांची आघाडी मिळविली आहे. सौद शकील आणि बाबर आझम यांनी अर्धशतके झळकविली. जेनसेनने 42 धावांत 5 बळी मिळविले आहेत.
या कसोटीत पाकचा पहिला डाव 211 धावांवर आटोपल्यानंतर द. आफ्रिकेने पहिल्या डावात 301 धावा जमवित 90 धावांची आघाडी घेतली. पाकने 3 बाद 88 या धावसंख्येवरुन तिसऱ्या दिवशीच्या खेळाला प्रारंभ केला. बाबर आझमने 9 चौकारांसह 50 धावांवर बाद झाला तर सौद शकील 8 चौकारांसह 66 धावांवर खेळत आहे. आयुबने 6 चौकारांसह 27, कर्णधार मसुदने 4 चौकारांसह 28, जमालने 2 चौकारांसह 18 धावा जमविल्या. उपाहारापर्यंत पावसामुळे खेळ होऊ शकला नाही. खेळाच्या दुसऱ्या सत्रामध्ये द. आफ्रिकेचा जेनसेन प्रभावी ठरला. चहापानापर्यंतच्या दुसऱ्या सत्रामध्ये पाकने 5 गडी गमविले. या कसोटीतील खेळाचे दोन दिवस बाकी असून द. आफ्रिकेचा संघ विजयाच्या दिशेने वाटचाल करीत आहे.
संक्षिप्त धावफलक: पाक प. डाव 211, द. आफ्रिका प. डाव 301, पाक. दु. डाव 52 षटकात 8 बाद 212 (बाबर आझम 50, सौद शकील खेळत आहे 66, अयुब 27, मसुद 28, जमाल 18, जेनसेन 5-42, रबाडा 2-68, पॅटर्सन 1-41)









