Pakistan Government Twitter Ban In India : पीएफआय बंदीवरून भारतात चर्चा सुरु असतानाच आता आणखी एक माहिती समोर आली आहे. भारतात पाकिस्तान सरकारचं ट्विटर अकाउंट बंद करण्यात आलं आहे.
हे ट्विटर अकाउंट भारतीय ट्विटर युजर्ससाठी ब्लॉक करण्यात आलं आहे. सरकारच्या ट्विटर अकाउंटवरून पीएफआय (PFI) बंदीच्या विरोधात ट्वीट करण्यात आलं होतं. त्यामुळेच ही कारवाई झाल्याची माहिती मिळत आहे. अनेक तक्रारी आल्यानंतर ही कारवाई करण्यात आल्याचं ट्विटरकडून सांगण्यात आलं आहे.
एएनआयच्या अहवालानुसार, जुलैमध्ये भारताने अनेक पाकिस्तानी हँडलवर बंदी घातली होती, परंतु नंतर ते पुन्हा सक्रिय करण्यात आले होते. जूनमध्ये भारतातील ट्विटरने यूएन, तुर्की, इराण आणि इजिप्तमधील पाकिस्तानी दूतावासांच्या अधिकृत खात्यांवर बंदी घातली होती. आतापर्यंत केंद्र सरकारने भारताविरुद्ध द्वेष पसरवणाऱ्या १०० हून अधिक यूट्यूब चॅनेल, ४ फेसबुक पेज, ५ ट्विटर अकाऊंट आणि ३ इन्स्टाग्राम खाती ब्लॉक केली आहेत.