भारताकडून सिंधू जल करार स्थगित झाल्याने पूरसंकटाचा दावा
वृत्तसंस्था/ लाहोर
रावी, सतलज आणि व्यास नदीच्या पातळीत मोठी वाढ झाल्याने पंजाबमध्ये पूर आला आहे. राज्यातील बहुतांश जिल्ह्यांमधील सखल भाग जलमय झाले आहेत. तर दुसरीकडे रावी नदीची पातळी वाढल्याने पाकिस्तानातही पूर आला आहे. पाकिस्तानच्या लाहोरमध्येही पुराचे पाणी शिरले आहे. पाकिस्तानने पूरासाठी भारताला जबाबदार ठरविण्यास सुरुवात केली आहे. रावी नदीवर भारतात निर्मित माधोपूर हेडवर्क्समध्ये तांत्रिक समस्येमुळे पूरसंकट निर्माण झाल्याचे पाकिस्तानचे सांगणे आहे.
भारताने नदीची पातळी वाढल्याची पूर्वसूचना दिली नाही आणि यामुळे तयारीची संधी मिळाली नसल्याचे पाकिस्तानचे म्हणणे आहे. रावी नदीमुळे पूरसंकट निर्माण होऊ शकते याची माहिती भारताने एकदाही दिली नसल्याचे पाकिस्तानी अधिकाऱ्यांनी म्हटले. सिंधू जल करार रोखण्यात आल्याने ही स्थिती निर्माण झाली आहे, अन्यथा हे घडले नसते, असे पाकिस्तानचे सांगणे आहे.
तवी नदीत पातळी वाढणार असल्याची पहिली सूचना भारताकडून मिळाली होती. मग दोनवेळा सतलज नदीच्या पातळीत वाढ होत असल्याचे भारताकडून सांगण्यात आले. परंतु रावी नदीविषयी अशी कुठलीच माहिती मिळालेली नसल्याचे पाकिस्तानने म्हटले आहे. तर माधोपूर हेडवर्क्समधील कमीतकमी 4 गेट खराब झाले आहेत. यामुळे मोठ्या प्रमाणात शेतजमीन पाण्याखाली गेली आहे. एकूण 54 फ्लडगेट्स असून त्यापैकी कुठलेच अनेक वर्षांपासून अपग्रेड करण्यात आलेले नाही असा आरोप पाकिस्तानने केला आहे.
माधोपूर हेडवर्क रावी नदीवर गुरदासपूर जिल्ह्यात आहे. याच्याच माध्यमातून बारी दोआब कालव्यात सिंचनासाठी पाणी सोडले जाते. हा कालवा गुरदासपूर, अमृतसर, तरनतारन आणि अन्य भागांमध्ये सिंचनाची व्यवस्था करतो. लाहोरच्या शाहदरामध्ये रावीच्या पात्रात 2 लाख 20 हजार क्यूसेक पाणी आल्याने स्थिती बिघडल्याचे पाकिस्तानचे सांगणे आहे.
हेडवर्क म्हणजे काय?
नदीत हायवर्जन हेडवर्क्सची निर्मिती केली जाते, जेणेकरून कालव्यात येणाऱ्या पाणीला नियंत्रित करता येऊ शकेल. हेडवर्क्स कालव्यात गाळाच्या प्रवेशाला नियंत्रित करतात. हे बॅराजच्या तुलनेत आकाराने छोटे असतात, हेडवर्क्स एक इंजिनियरिंग शब्द असून याचा वापर जलमार्गावरील कुठल्याही संरचनेसाठी केला जातो. याचा वापर नदीच्या पाण्याला कालव्यात वळविण्यासाठी केला जातो.
लव्ह जिहादप्रकरणी काँग्रेस नगरसेवकाचे आत्मसमर्पण
इंदोर : लव्ह जिहादप्रकरणी फरार काँग्रेस नगरसेवक अन्वर कादरीला इंदोर न्यायालयासमोर आत्मसमर्पण करावे लागले आहे. अन्वर विरोधात 40 हजार रुपयांचे इनाम घोषित करण्यात आले होते. बाणगंगा पोलीस स्थानकात त्याच्या विरोधात दोन गुन्हे नोंद आहेत. अन्वर कादरीच्या कन्येला पोलिसांनी यापूर्वीच अटक केली आहे. हिंदू युवतींवर बलात्कार करविण्याचा गंभीर आरोप अन्वर विरोधात आहे. अन्वरकडून आर्थिक रसद मिळाल्याची माहिती बलात्कार आणि लव्ह जिहादचा आरोपी अल्ताफ खान आणि साहिलने दिली होती. हिंदू युवतींशी विवाह करा आणि त्यांना अवैध धंद्यात सामील करा, असे अन्वरने या दोन्ही आरोपींना 3 लाख रुपये देत सांगितले होते.









