वृत्तसंस्था/बेंगळूर
सध्या भारतात सुरू असलेल्या आयसीसीच्या 2023 सालातील विश्व चषक क्रिकेट स्पर्धेत बेंगळूरमध्ये चिन्नास्वामी स्टेडीयमवर शनिवारी झालेल्या सामन्यात पाक संघाला षटकांची गती राखता न आल्याने आयसीसीने या संघातील खेळाडूना दंड ठोठावला आहे.
बाबर आझमच्या नेतृत्वाखाली पाक संघाने या सामन्यात न्यूझीलंडचा डकवर्थ लेविस नियमाच्या आधारे 21 धावांनी पराभव केला होता. आयसीसीच्या या निर्णयामुळे आता पाक संघातील प्रत्येक खेळाडूला मिळणाऱ्या मानधन रकमेतील 10 टक्के रक्कम दंड म्हणून द्यावा लागणार आहे. आयसीसीचे सामनाधिकारी रिची रिचर्डसन यांनी पाक संघावर हा दंड ठोठावण्याचा निर्णय घेतला होता.









