ट्विटर हँडलद्वारे मित्रदेशांकडून मागितले कर्ज
ऑपरेशन सिंदूरने बिथरलेला पाकिस्तान भारताच्या सैन्य आणि नागरी भागांवर हल्ले करू पाहतोय, भारताने त्याचे हे सर्व हल्ले हाणून पाडले आहेत. याचदरम्यान पाकिस्तान सरकारचा एक ट्विट सोशल मीडियावर व्हायरल झाला असून त्यात तो कर्जासाठी विनंती करत आहे. पाकिस्तानच्या आर्थिक विषयक मंत्रालयाच्या एक्स हँडलवरून कर्जाची मागणी करणारी ट्विट केला आहे. परंतु नंतर पाकिस्तान सरकारने आपले एक्स अकौंट हॅक झाल्याचा कांगावा केला. परंतु तोपर्यंत जगभरात पाकिस्तानची फजिती झाली.
भारतासोबतच्या संघर्षाच्या स्थितीत पाकिस्तानने स्वत:च्या सहकारी देशांकडून कर्ज मागितले होते. भारताने आम्हाला प्रचंड नुकसान पोहोचविले असल्याने आम्हाला आणखी कर्ज हवे आहे. वर्तमान स्थिती आणि शेअरबाजाराची बिकट स्थिती पाहता आम्ही आंतरराष्ट्रीय भागीदारांकडून मदत इच्छितो असे पाक सरकारने स्वत:च्या पोस्टमध्ये म्हटले होते. या पोस्टमध्ये जागतिक बँकेलाही टॅग करण्यात आले होते.
पीआयबी इंडियाने देखील पाकिस्तान सरकारच्या या पोस्टला शेअर करत उपहास केला. सोशल मीडियावर या पोस्टवरून विविध प्रकारचे मीम शेअर करण्यात येत आहेत.









