गिलगिट :
पाकिस्तानच्या कब्जातील गिलगिट-बाल्टिस्तानच्या चिलास येथे एक हेलिकॉप्टर कोसळले आहे. या दुर्घटनेत 5 जणांचा मृत्यू झाला आहे. हे पाकिस्तानी सैन्याचे एमआय-17 हेलिकॉप्टर होते असा दावा करण्यात येत आहे. दुर्घटनेचे कारण अद्याप उघड झालेले नाही. मृतांमध्ये हेलिकॉप्टरचे दोन वैमानिक आणि तीन तंत्रज्ञ सामील आहेत.









