इस्लामाबाद
बलुचिस्तानात पूरसंकटादरम्यान सुरू असलेल्या बचावमोहिमेत तैनात पाकिस्तानी सैन्याचे एक हेलिकॉप्टर बेपत्ता झाले होते. हे हेलिकॉप्टर दुर्घटनाग्रस्त झाल्याचे समोर आले आहे. या हेलिकॉप्टरमधून सैन्याचे 6 वरिष्ठ अधिकारी प्रवास करत होते. हे सर्व अधिकारी या दुर्घटनेत ठार झाले आहेत. बलुचिस्तानच्या लासबेलामध्ये बचावकार्यात सामील झालेल्या सैन्याच्या हेलिकॉप्टरचा एटीसीशी असलेला संपर्क तुटला होता. खराब हवामानामुळे ही दुर्घटना घडल्याची माहिती पाकिस्तानच्या इंटर सर्व्हिसेस पब्लिक रिलेशन्सचे महासंचालक मेजर जनरल बाबर इफ्तिखार यांनी दिली आहे.









