वृत्तसंस्था/ लाहोर (पाक)
आयसीसी टी-20 पुरूषांची विश्वचषक क्रिकेट स्पर्धा ऑस्ट्रेलियात खेळविली जाणार आहे. या महत्त्वाच्या स्पर्धेपूर्वी सरावासाठी पाकने तिरंगी टी-20 मालिकेची घोषणा केली आहे.
या तिरंगी टी-20 मालिकेत पाक, न्यूझीलंड आणि बांगलादेश यांचा समावेश आहे. बाबर आझमच्या नेतृत्वाखाली पाक संघ येत्या ऑक्टोबरमध्ये न्यूझीलंड दौऱयावर जाणार आहे. या दौऱयात पाक संघाला किमान चार सामने खेळण्याची संधी मिळणार आहे. ही तिरंगी मालिका न्यूझीलंडमधील खाईस्टचर्च येथे खेळविली जाणार असून 2018 नंतर उभय संघामध्ये पहिल्यांदा बाबर आझमला खेळण्याची संधी मिळणार आहे. अंगठय़ाला झालेल्या दुखापतीमुळे पाकचा कर्णधार बाबर आझमला त्या मालिकेत खेळता आले नव्हते.