6 अधिकाऱयांचा मृत्यू
वृत्तसंस्था/ क्वेटा
पाकिस्तानच्या बलुचिस्तानात सोमवारी सैन्याचे एक हेलिकॉप्टर कोसळले आहे. या घटनेत वैमानिकासह 6 सैन्याधिकारी मृत्युमुखी पडले आहेत. खोस्त शहरातून सैन्याचे हेलिकॉप्टर रविवारी रात्री मोहिमेवर निघाले होते. याचदरम्यान हे हेलिकॉप्टर कोसळले असून यामागील कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. तर बलुच संघटनांनी आपण हे हेलिकॉप्टर पाडविल्याचा दावा केला आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी या घटनेप्रकरणी दुःख व्यक्त पेले आहे. मागील महिन्यातही बलुचिस्तानात सैन्याचे हेलिकॉप्टर कोसळले होते. या दुर्घटनेत 6 पाकिस्तानी सैन्याधिकाऱयांना जीव गमवावा लागला होता.









