वृत्तसंस्था/ कराची
पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्यात तीन सामन्यांची वनडे मालिका लंकेमध्ये खेळवली जाणार आहे. 22 ऑगस्टपासून या मालिकेला प्रारंभ होत आहे.
या मालिकेतील पहिला सामना 22 ऑगस्टला, दुसरा सामना 24 ऑगस्ट तर तिसरा आणि शेवटचा सामना 26 ऑगस्टला होणार आहे. या मालिकेतील पहिले दोन सामने हंबनटोटा येथे तर शेवटचा सामना कोलंबोत खेळवला जाईल. पाक आणि अफगाण यांच्यात आतापर्यंत चार वनडे सामने झाले असून ते सर्व सामने पाकने जिंकले आहेत. यापूर्वी उभय संघातील सामना 2019 च्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत झाला होता.









