वाहनधारकांनी शिस्त पाळण्याची गरज
प्रतिनिधी / बेळगाव
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात असणाऱ्या मोकळ्या जागेचा विकास करण्यात आला आहे. वाहनांच्या पार्किंगसाठी सोय करण्यात आली आहे. विकासकामाची रंगरंगोटी केली जात आहे. वाहने सुव्यवस्थित थांबावीत यासाठी पांढरे पट्टे मारण्यात येत आहेत.
याठिकाणी येणाऱ्या वाहनांना व्यवस्थित पार्किंगची सोय व्हावी व बेशिस्त पार्किंगमुळे होणारी वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी सुसज्ज पार्किंग व्यवस्था करण्यात आली आहे. रस्त्यांचा विकास करण्यात आला आहे. रस्त्यावर थांबविण्यात येणाऱ्या वाहनांमुळे होणारी वाहतूक कोंडी दूर करण्याचा प्रयत्न जिल्हा प्रशासनाकडून करण्यात येत आहे. याला वाहनधारकांनीही साथ देण्याची गरज आहे. जागा मिळेल त्याठिकाणी वाहने पार्किंग केली जात असल्याने वाहतूक कोंडीत भर पडत आहे. याची दखल घेऊन या भागाचा विकास केला आहे. वाहने रांगेत थांबवावीत, यासाठी रंगरंगोटी व मार्किंग केले जात आहे. यापुढे तरी वाहनधारकांनी शिस्त पाळावी, अशी अपेक्षा प्रशासनाकडून केली जात आहे.
रहदारी पोलिसांची कसरत
येथील रस्त्याचा विकास करून रुंदीकरण करण्यात आले आहे. यामुळे रहदारीला सोय झाली आहे. रस्ता वाहनांच्या ये-जा करण्यासाठी सोयीचा झाला आहे. मात्र अनेक वाहनधारक रस्त्यावरच वाहने थांबवत असल्याने वाहतूक कोंडीत भर पडत आहे. सदर वाहतूक
कोंडी दूर करण्यासाठी रहदारी पोलिसांची नेमणूक करण्यात आली आहे. वाहनधारकांनीही आपली जबाबदारी ओळखून वाहने पार्किंग करणे अपेक्षित आहे. मात्र वाहनधारकांच्या बेशिस्तपणामुळे रहदारी पोलिसांनाही वाहने हटविण्यासाठी कसरत करावी लागत आहे.









