काडसिद्धेश्वर महाराज जयंतीनिमित्त आयोजन ः दादा मुल्लानी, पूजा सासणे उपविजेते
वार्ताहर/ निपाणी
सिद्धगिरीमठ कणेरी या ठिकाणी ब्रह्मलिन जगद्गुरु काडसिद्धेश्वर महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून निकाली कुस्ती मैदानाचे आयोजन करण्यात आले होते. या कुस्ती मैदानात महिला व पुरुष अशा दोन गटात कुस्त्या खेळवण्यात आल्या. यामध्ये पुरुष गटातून प्रथम क्रमांकाची कुस्ती दादा मुल्लानी व रोहितकुमार यांच्या मध्ये झाली. यामध्ये रोहित कुमारने उलटी लपेट डावावर विजय मिळवत दादा मुल्लानी याला चित्रपट करून विजय मिळवला. तर महिला गटात सीमा पाटील हिने पूजा पाटील हिला चितपट करत विजय नोंदवला. मान्यवरांच्या हस्ते विजेत्यांना बक्षीस देऊन गौरविण्यात आले
कुस्ती मैदानाचे उद्घाटन निपाणी समाधी मठाचे प्राणलिंग स्वामीजी यांच्या हस्ते करण्यात आले. या कुस्ती मैदानात दोन्ही गटातून 120 कुस्त्या खेळवण्यात आल्या. द्वितीय क्रमांकाची कुस्ती नागराज पुजारी विरुद्ध विक्रांत दिल्ली यांच्यात झाली. नागराज पुजारीने एक चक डावावर विजय मिळवला. तृतीय क्रमांकाची कुस्ती अरुण बोंगार्डे व बंटी कुमार यांच्यात झाली. यामध्ये बंटी कुमारने घुटना डावावर विजय मिळवला. या कुस्ती मैदानासाठी ज्योतीप्रसाद जोल्ले, निवृत्ती पाटील, शशिकांत पाटील, सागर देसाई, प्रा. डी. एम. पाटील, पंडित पवार यांनी सहकार्य दिले. पंच म्हणून बाळू सुतार, वसंत पाटील, बाजीराव वाडकर, शिवाजी संकपाळ, तुकाराम चोपडे, निवास जबडे, विलास टिपूकडे, शिवाजी गुडाळ यांनी कार्यसेवा दिली.









