इलेक्ट्रॉनिक उपकरणे, फर्निचर, मोबाईल खरेदी करता येणार एकाच छताखाली
प्रतिनिधी/ बेळगाव
इलेक्ट्रॉनिक्स तसेच गृहोपयोगी वस्तूंच्या खरेदीसाठी खात्रीशीर नाव म्हणजे ‘पै इंटरनॅशनल इलेक्ट्रॉनिक्स’. या पै इंटरनॅशनल इलेक्ट्रॉनिक्सचे भव्य नवे शोरुम खानापूर रोड येथील संत बसवेश्वर चौकानजीक सुरू करण्यात आले आहे. या शोरुमचे उद्घाटन शनिवारी मोठ्या थाटात करण्यात आले. टीव्ही, मोबाईल, फ्रीज, वॉशिंग मशीन, लॅपटॉप यासह इतर सर्व इलेक्ट्रॉनिक उपकरणे व गृहोपयोगी वस्तू एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आल्याने पहिल्याच दिवशी ग्राहकांनी प्रचंड गर्दी केली होती.
पै इंटरनॅशनल इलेक्ट्रॉनिक्सला नुकतीच 25 वर्षे पूर्ण झाली असून मागील पंधरा वर्षांपासून बेळगावच्या खडेबाजार येथे त्यांचे पहिले शोरुम सुरू आहे. ग्राहकांच्या विश्वासार्हतेमुळे या ब्रँडने शहरात ठिकठिकाणी पै मोबाईल्सचे स्टोअर सुरू केले होते. परंतु शहराच्या दक्षिण भागात एखादे मोठे शोरुम करावे, अशी चोखंदळ ग्राहकांची मागणी होती. त्यानुसार गोवावेस येथे तब्बल 9 हजार स्क्वेअर फूट जागेमध्ये सर्व सेवासुविधांनी उपलब्ध असलेले शोरुम सुरू करण्यात आले आहे. इलेक्ट्रॉनिक उपकरणांसोबतच या ठिकाणी लॅपटॉप, मोबाईल, फर्निचर यासह इतर गृहोपयोगी वस्तू ग्राहकांना खरेदी करता येणार आहेत.
पै इंटरनॅशनल इलेक्ट्रॉनिकच्या फायनान्शियल डायरेक्टर वीणा राजकुमार पै यांच्या हस्ते शोरुमचे उद्घाटन झाले. या कार्यक्रमाला संचालक राहुल पै, आमदार अभय पाटील, नगरसेवक गिरीश धोंगडी यांच्यासह पै परिवारातील सदस्य उपस्थित होते. यावेळी उपस्थित मान्यवरांनी शोरुमला शुभेच्छा देत बेळगावमधील नागरिक शोरुमला उत्तम प्रतिसाद देतील, असा विश्वास व्यक्त पेला.
पै इंटरनॅशनलचा विस्तार कर्नाटक, आंध्रप्रदेश व तेलंगणा या राज्यांमध्ये आहे. मागील 25 वर्षात पै इंटरनॅशनलची तब्बल 223 स्टोअर सुरू करण्यात आली आहेत. शनिवारी 224 वे स्टोअर बेळगावमध्ये सुरू करण्यात आले आहे. ग्राहकांना सर्व इलेक्ट्रॉनिक वस्तू तसेच गृहोपयोगी साहित्य एकाच ठिकाणी घेता यावे, यासाठी भव्य शोरुम सुरू करण्यात आले असून त्याचा ग्राहकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन पै इलेक्ट्रॉनिक्सतर्फे करण्यात आले आहे.
उद्घाटनानिमित्त विशेष ऑफर
पै इंटरनॅशनल इलेक्ट्रॉनिक्सने नव्या शोरुमच्या उद्घाटनानिमित्त अनेक ऑफर्स ग्राहकांना उपलब्ध करून दिल्या आहेत. 5 हजार रुपयांपेक्षा अधिक खरेदीवर वॉटर बॉटल, 7500 पेक्षा अधिक खरेदीवर मॅग्नम टिफिन बॉक्स, 10 हजारपेक्षा अधिक खरेदीवर आर. बी. कढाई व 15 हजारपेक्षा अधिक खरेदीवर पिलो मोफत दिले जाणार आहेत. त्याबरोबरच 2 हजारपेक्षा अधिक खरेदी करणाऱ्या ग्राहकांना फ्री कुपन दिले जाणार असून यातील विजेत्यांना 25 कार, त्याचबरोबर पै मेगा फेस्टिव्हल सेलमध्ये 17 कोटी पै लॉयल्टी पॉईंट्स रिडीम करण्याची संधी उपलब्ध होणार आहे.









