नागरिकांचा जीवघेणा प्रवास सुरूच
बाजारभोगाव / वार्ताहर
पन्हाळा तालुक्यातील जांभळी खोऱ्याचे प्रवेशद्वार पाण्याखाली गेले आहे. बाजारभोगाव व पोर्ले बंधाऱ्या नजीक पडसाळी रस्त्यावर कासारी नदीचे पाणी आल्याने सुमारे दोनशे मिटरवरील रस्ता पाण्याखाली गेला आहे. त्यामुळे संपूर्ण जांभळी खोऱ्याचा संपर्क तुटला आहे. परिसरातील सहा गावे व वाड्या वस्त्या संपर्कहीन झाल्या आहेत. सध्या सुमारे तीन साडे तीन फुट इतके पाणी रस्त्यावरून वाहत आहे. या पाण्यातूनच नागरिकांचा जीवघेणा प्रवास सुरू आहे. काही अतिउत्साही तरूण विनाकारण ये जा करीत आहेत. या ठिकाणी पाण्यातून प्रवास करणाऱ्या काही दुचाकी स्वारांच्या दुचाकी बंद पडल्याचं पहायला मिळालं. नदीकाठावर रस्त्यालगत लोखंडी बॕरीकेटस् नाही.कोणताही आधार नाही. तरीही नागरिक नसतं धाडस करीत आहेत. प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष असल्याचं दिसून येत आहे. दरम्यान बाजारभोगाव बाजारपेठत पूराच्या पाण्याची एन्ट्री झाली आहे. त्यामुळे ग्रामपंचायत प्रशासन सतर्क झाले आहे.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









