रविवारी होणार अंत्यसंस्कार
प्रतिनिधी/ बेळगाव
कामत गल्ली येथील प्रतिष्ठित रहिवासी पद्मजादेवी नाथाजीराव हलगेकर (वय 85) यांचे शनिवार दि. 12 रोजी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुली, एक मुलगा, जावई, सून, नातवंडे असा परिवार आहे. रविवार दि. 13 ऑगस्ट रोजी सकाळी 10 वाजता कामत गल्ली, स्मशानभूमी येथे पद्मजादेवी यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
पद्मजादेवी मूळच्या कोल्हापूरच्या पवार घराण्यातील कन्या. मराठा मंडळचे संस्थापक नाथाजीराव गुरुअण्णा हलगेकर यांच्याशी विवाह झाल्यावर त्या बेळगावला आल्या. नाथाजीरावांच्या शैक्षणिक कार्यामध्ये त्यांचे नेहमीच सहकार्य लाभले. प्रसिद्धीच्या झोतात न येता त्यांनी सर्वांना साथ दिली. मराठा मंडळच्या विद्यमान अध्यक्षा राजश्री हलगेकर व पुण्याच्या डॉ. सत्वशिला शिरोळे, तसेच मराठा मंडळचे उपाध्यक्ष राजेश हलगेकर यांच्या त्या आई तर विधान परिषद सदस्य नागराजू यादव, पुणे येथील उद्योगपती चैतन्य शिरोळे व धनश्री हलगेकर यांच्या त्या सासूबाई होत.









