मुंबई
सूर्या रोशनी कंपनीने अलीकडेच जितेंद्र अगरवाल यांची सीईओ म्हणून नियुक्ती केली आहे. लाइटिंग आणि कंझुमर उत्पादनांच्या निर्मितीमध्ये सूर्या रोशनीचा महत्त्वाचा वाटा राहिला आहे. जितेंद्र अगरवाल हे यापूर्वी लुमिनस पॉवर टेक्नॉलॉजी प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीमध्ये कार्यरत होते. ते उपाध्यक्ष म्हणून तेथील कंपनीचा व्यवसाय सांभाळत होते. यापूर्वी त्यांनी 19 वर्षे फिलिप्स इंडिया लिमिटेडमध्येही महत्त्वाची भूमिका निभावली होती.









