वार्ताहर/मजगाव
उद्यमबाग-ब्रह्मनगर परिसरातील पावसाचे पाणी शिरून ब्रह्मनगर परिसरातील सुमारे 25 एकर भातपीक पाण्याखाली गेले आहे. गेले चार दिवस संततधार पाऊस पडत असल्याने पावसाचे पाणी ब्रह्मनगर वसाहतीचे पाणी व संगोळ्ळी रायण्णा नगरचे पाणी एकत्र येवून येथील भात शेतीमध्ये तुंबल्याने तलावाचे स्वरूप प्राप्त झाले आहे. त्यामुळे येथील 25 एकरमधील भात कुजून जाण्याच्या मार्गावर आहे. संबंधीतांनी पाहणी करून तुंबलेल्या पाण्याला वाट करून शेतकऱ्यांची पिके वाचवावीत, अशी मागणी शेतकरी करीत आहेत.









