वृत्तसंस्था/ माद्रिद (स्पेन)
विश्व बॅडमिंटन फेडरेशनच्या येथे सुरू असलेल्या माद्रिद स्पेन मास्टर्स पुरुष आणि महिलांच्या आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेत भारताची अव्वल बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधूने एकेरीची अंतिम फेरी गाठली आहे.
या स्पर्धेतील महिला एकेरीच्या उपांत्य सामन्यात पी. व्ही. सिंधूने सिंगापूरच्या येओ जिया मिनचा 24-22, 22-20 अशा सरळ गेम्समध्ये पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश मिळवला आहे. हा उपांत्य फेरीचा सामना 48 मिनिटे चालला होता. आता या स्पर्धेत पी. व्ही. सिंधूचा अंतिम सामना स्पेनची कॅरोलिना मॅरीन आणि इंडोनेशियाची ग्रेगोरिया तुनजुंग यांच्यातील विजयी खेळाडूबरोबर होणार आहे.









