वृत्तसंस्था / अॅस्टेना (कझाकस्थान)
येथे सुरू असलेल्या आशियाई युवा आणि कनिष्ठांच्या वेटलिफ्टिंग चॅम्पियनशिप स्पर्धेत भारताच्या महिला वेटलिफ्टर पुंगीनी ताराने युवा मुलींच्या 44 किलो वजन गटात रौप्य पदक मिळविले.
ताराने या वजन गटात स्नॅचमध्ये 60 किलो तर क्लिन आणि जर्कमध्ये 81 किलो असे एकूण 141 किलो वजन उचलत रौप्य पदक पटकाविले. स्पर्धेच्या पहिल्या दिवशी भारताने पदक तक्त्यात आपले खाते उघडले. या आंतरखंडीय वेटलिफ्टिंग स्पर्धेत स्पर्धकांना स्नॅच, क्लिन आणि जर्क तसेच एकूण अशा विविध गटामध्ये पदके दिली जात आहेत.









