प्रतिनिधी /बेळगाव
केएलई व्ही. के. इन्स्टिटय़ूट ऑफ डेंटल सायन्सेस बेळगावचे पी. जी. विद्यार्थी आणि प्राध्यापक यांनी पीएमएनएम डेंटल कॉलेज आणि हॉस्पिटल, बागलकोट आयोजित आठव्या इंडियन प्रोस्थोडॉन्टिक्स सोसायटी कर्नाटक राज्य वार्षिक सभेत विविध बक्षिसे मिळविली.
प्रा. डॉ. आदित्य आचार्य यांना सर्वोत्कृष्ट सायंटिफिक फॅकल्टी प्रेसेंटेशन म्हणून गौरविण्यात आले. डॉ. करुणा पटवर्धन, डॉ. यामिनी पराग यांना सायंटिफिक पोस्टर प्रेसेंटेशनसाठी प्रथम पारितोषिक मिळाले.
डॉ. नीशा पुराणिक आणि डॉ. श्रेया चिंडक यांना टेबल क्लिनिकसाठी प्रथम पारितोषिक मिळाले. प्रा. डॉ. रमेश नायकर यांची 2 वर्षांसाठी कर्नाटक स्टेट प्रोस्थोडॉन्टिक सोसायटीचे ईसी सदस्य म्हणून निवड झाली आहे. कर्नाटक, महाराष्ट्र आणि तेलंगणाच्या विविध कॉलेजमधून सभेला 250 हून अधिक सदस्य उपस्थित
होते. प्राचार्या डॉ. अलका काळे, विभाग प्रमुख डॉ. आनंदकुमार जी. पाटील यांनी विजेत्यांचे अभिनंदन केले आहे.









