मुंबई
हॉस्पिटॅलिटी क्षेत्रातील फर्म ओयो पुन्हा एकदा आयपीओकरिता आपला अर्ज नव्याने सादर करणार आहे. फेब्रुवारीच्या मध्यावर ओयो कंपनी आयपीओकरिता आवश्यक असणारी अतिरिक्त कागदपत्रे सादर करणार असल्याचे सांगितले जात आहे. सदरची कागदपत्रे बाजारातील नियामक सेक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया अर्थात सेबीकडे सादर करणार आहे. एकदा का अर्ज दाखल केला की सेबी या कागदपत्रांची पडताळणी करून एप्रिलपर्यंत आयपीओ सादरीकरणाकरिता ओयोला मान्यता देऊ शकते, असे सांगितले जाते. गुरुग्राममधील कंपनीने सप्टेंबर 2021 मध्ये सुरुवातीला 8430 कोटी रुपयांच्या आयपीओकरिता अर्ज सादर केला होता.









