सध्या ऑक्सिडाइज्ड ज्वेलरीचा ट्रेंड कायम आहे. हे दागिने कोणत्याही प्रसंगी कोणत्याही ड्रेससह मॅच करा येतात.यामध्ये अनेक व्हरायटी देखील बाजारात उपलब्ध झाली आहे. वेगवेगळ्या डिझाइन्समध्ये असणारे हे दागिने महिलांच्या सौंदर्यात भर घालतात. याच कारणामुळे आजकाल महिलांचा सोने, चांदी किंवा हिऱ्यापेक्षा या प्रकारच्या दागिन्यांची खरेदी करण्याकडे कल वाढला आहे.परंतु ऑक्सिडाइज्ड दागिन्यांना थोडी अधिक काळजी आवश्यक आहे.अन्यथा ती काळी पडतात.ऑक्सिडाइज्ड ज्वेलरी कशी ठेवली आणि साठवली जाऊ शकते आणि पुन्हा नव्यासारखी कशी दिसू शकते यासाठी काही टिप्स जाणून घेऊयात.
योग्य निगा राखल्यास सोन्याप्रमाणे ऑक्सिडाइज्ड दागिने बराच काळ टिकून राहतात.ऑक्सिडाइज्ड दागिने नेहमी कुठल्याही बंद डब्यात कापसाने झाकून ठेवावी. दागिने सूर्यप्रकाशापासून दूर ठेवावेत. फ्लोरोसेंट दिवे किंवा लाइट बल्बसारख्या घरातील प्रकाशाचा स्रोत कालांतराने ऑक्सिडाइज्ड दागिन्यांचा रंग बदलू शकते. त्यामुळे एअर-टाइट बॅगमध्ये किंवा ड्रॉवरमध्ये ते ठेवावेत. हवेच्या संपर्कात आल्यावर तुमचे दागिने अधिक ऑक्सिडाइझ झाले तर कोरडी टूथ पावडर आणि मऊ कापड वापरून ते हलक्या हाताने स्वच्छ करा आणि मूळ चमक परत येण्यास मदत होईल.जर तुम्ही संपूर्ण सेट स्टोअर करत असाल , तर कानातले एका वेगळ्या पिशवीत आणि नेकलेस एका वेगळ्या पिशवीत ठेवा.या पिशव्या एका एअर टाइट बॉक्समध्ये ठेवा. यामुळे दागिने बराच काळ सुरक्षित राहतात.
Trending
- Testing
- Test 5 Dec
- Test Post 12-11
- Satara : साताऱ्यात कंपनीच्या अन्यायाविरोधात भूमिपुत्रांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
- उद्या देवसू शेंडोबा माऊली वार्षिक जत्रोत्सव
- Satara Crime : ‘मी फरारी आहे’ म्हणत लल्लन जाधव टोळीचा उपद्रव; पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
- Miraj : मिरजेत शिक्षण संस्था चालकाला आठ लाखांचा गंडा
- आज सांगेली गिरीजानाथाचा वार्षिक जत्रोत्सव









