कुटुंबासमवेत झाला होता फरार
नवी दिल्ली
दिल्ली पोलिसांना मुंडका आग दुर्घटनाप्रकरणी रविवारी मोठे यश मिळाले आहे. पोलिसांनी संबंधित तीनमजली इमारतीच्या मालकाला अटक केली आहे. अनेक ठिकाणी छापे टाकल्यावर मनीष लकडाला अटक करण्यात आल्याची माहिती दिल्ली पोलिसांनी दिली आहे. यापूर्वी याप्रकरणी पोलिसांनी हरीश गोयल आणि वरुण गोयल यांना पूर्वीच अटक केली होती.
मुंडका येथील तीनमजली इमारतीच मालक सर्वात वरच्या मजल्यावर राहत होता. इमारतीकरता अग्निशमन दलाकडून ना हरकत दाखला मिळविण्यात आला नव्हता. तीनमजली इमारतीत आग लागलयावर मनीष लकडा स्वतःच्या कुटुंबीयांसमवेत फरार झाला होता. मनीषने पलायन करण्यासाठी पेनची मदत घेतली होती. दिल्ली पोलिसांनी त्याच्या विरोधात लुकआउट नोटीस जारी केली होते.
या दुर्घटनेस कारणीभूत ठरलेल्या हरीश आणि वरुण गोयल यांची पोलिसांनी चौकशी केली आहे. या इमारतीत 250 कर्मचारी काम करत होते. सुरक्षाविषयक उपाययोजनांचा तेथे अभाव होता. शुक्रवारी 13 मे रोजी संध्याकाळी या तीनमजली इमारतीत अचानक आग भडकल्याने 27 जणांना जीव गमवावा लागला होता. भीषण आगीपासून वाचण्यासाठी लोकांनी खिडक्यांमधून उडी घेतली होती.









