पाचल :
महाराष्ट्र शासन आरोग्य सेवा, सार्वजनिक आरोग्य विभागाकडून ग्रामीण रुग्णालय रायपाटण येथे महाआरोग्य शिबीर पार पडले. या शिबिराला उत्स्फुर्त प्रतिसाद लाभला.
शिबिराचे उद्घाटन आ.किरण सामंत यांचे प्रतिनिधी जिल्हा संघटक प्रकाशजी कुवळेकर, माजी महिला व बालकल्याण सभापती सौ.दुर्वाताई तावडे, उमेश पराडकर, गणेश तावडे, नरेश दुधवडकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी अंससर्गजन्य विभाग ग्रामीण ऊग्णालय रायपाटण यांच्याकडून रूग्णांवर मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयविकार, मानसिक आरोग्य, अंससर्गजन्य आजार, क्षयरोग छातीचा एक्सरा, ईसीजी इत्यादी तपासण्या करण्यात आल्या.








