मराठा युवक संघाची आंतर शालेय जलतरण स्पर्धा : मुलींच्या गटात ज्ञान प्रबोधन- सेंट जोसेफ संयुक्त विजेते
बेळगाव ; मराठा युवक संघ आयोजित कै. एल आर पाटील यांच्या स्मरणार्थ निमंत्रितांच्या आंतर शालेय जलतरण स्पर्धेत मुलांच्या गटात सेंट पॉल स्कूलने 73 गुणासह सर्वसाधारण विजेतेपद, तर मुलींच्या गटात ज्ञान प्रबोधन मंदिर व सेंट जोसेफ स्कूलने 39 गुणासह संयुक्त विजेतेपद मिळविले. सेंट झेवियर्स स्कूलला मुलांच्या गटात उपवितेपदावर समाधान मानावे लागले. गोवावेस येथील महानगरपालिकेच्या जलतरण तलावात झालेल्या मराठा युवक संघाच्या आंतरराज्य, शालेय व विद्यापीठ जलतरण स्पर्धा रात्री पार पडली. सविस्तर निकाल पुढीलप्रमाणे : वैयक्तीक विजेतेपद मुलींमध्ये कॉलेज गट इमानी जाधव (आरटीपीयू), ग्रुप 1- पूजा राऊळ (गोवा), सुनिधी हलकारे (डीपीएम), ग्रुप 2- वेदा खानोलकर (जी.जी.चिटणीस), ग्रुप 3- दिशा होंडी (भंडारी स्कूल), ग्रुप 4- निधी मुचंडी (सेंट मेरीज), ग्रुप 5- रेहा पोरवाल (केएलई), ग्रुप 6- रिबेका (हुबळी) यानी तर मुले वैयक्तिक विजेतेपद कॉलेज ग्रुप-तनिष्क मोरे (जीएसएस) व दर्शन वरून (अरिहंत), ग्रुप 1- अमन सुनगार (सेंट पॉल्स), ग्रुप-2 अनिश पै (केएलई), ग्रुप 3-वेदांत मिसाळे (ज्योती सेंट्रल), ग्रुप 4-रक्षित कोरे (लव्हडेल), ग्रुप 5-अद्वैत जोशी (केएलएस), ग्रुप 6-अथर्व कम्मार (संत मीरा) यांनी विजेतेपद पटकाविले.
बक्षीस समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून मार्कंडेय शुगर फॅक्टरीचे नवनिर्वाचित संचालक सुनील अष्टेकर उपस्थित होते. यांचा मराठा युवक संघाचे अध्यक्ष बाळासाहेब काकतकर यांच्या हस्ते शाल व श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला. विजेते सेंट पॉल्स स्कूल संघाला चषक देऊन गौरविण्यात आले. मुलींच्या गटातील विजेत्या सेंट जोसेफ व ज्ञान प्रबोधन स्कुलला मराठा युवक संघाचे सेक्रेटरी चंद्रकांत गुंडकल व कार्याध्यक्ष रघुनाथ बांडगी यांच्या हस्ते चषक देऊन गौरविण्यात आले. मुलांच्या गटातील उपविजेत्या सेंट झेवियर्स स्कूलला शेखर हंडे व नेताजी जाधव यांच्या हस्ते चषक देण्यात आले. यावेळी व्यासपिठावर उद्योजक श्रीकांत देसाई, दीपक गायकवाड, आबा क्लबचे अध्यक्ष शितल हुलबत्ते, एनआयएस जलतरण प्रशिक्षक विश्वास पवार व इतर मान्यवर उपस्थित होते. ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी आबा व हिंद क्लबचे अॅड. मोहन सप्रे, शितल हुलबत्ते, अमित जाधव, संदीप मोहित, मारुती घाडी, रणजीत पाटील, शिवराज मोहिते, शुभांगी मंगळूरकर, ज्योती पवार, शितल जाधव, विजया शिरसाठ, गौरी जुवळी, प्रसन्ना बसुर्तेकर, श्रीदेवी रोटी, किशोर पाटील, विशाल वेसणे, विजय नाईक, भूषण पवार, अमरनाथ मिलगे, विजय भोगण, भरत पाटील, कल्लाप्पा पाटील, प्रसाद दरवंदर, निखिल भेकने, अॅड सुधीर धामणकर, अॅड संतोष गडकरी, डॉ. सुधीर जोशी, सुनील जाधव, संतोष अक्की, संजय कडेमणी, प्रविण भोसले, वैभव शानबाग, आशुतोष बेळगोजी, ऋषिकेश जाधव, संजय मरगाळे, विनय वेर्णेकर, अमर होनगेकर, वैभव खानोलकर, पुंडलिक कांबळे यांनी विशेष परिश्रम घेतले.









