क्रीडा प्रतिनिधी /बेळगाव
संत मीरा स्कूल आयोजित विद्याभारती कर्नाटक यांच्या मान्यतेनुसार जिल्हास्तरीय विद्याभारती क्रीडा स्पर्धेत बेळगावच्या संत मीरा संघाने 249 गुणांसह सर्वसाधारण विजेतेपद पटकाविले. शांती निकेतन खानापूर संघाने 224 गुणासह उपविजेतेपद तर देवेंद्र जिनगौडा (शिंदोळी) संघाने 35 गुणासह तिसरा क्रमांक मिळविला.
प्राथमिक गटात इशांत देवलतकर (शांतीनिकेतन), श्रध्दा कोल्हापुरे (संत मीरा), श्रावणी पाटील (शांती निकेतन), स्वरुपा हलगेकर (संत मीरा), किर्ती मुरगोड (संत मीरा), तेजस्वीनी कोल्हे (संत मीरा) यांनी वैयक्तिक विजेतेपद पटकाविले.
नेहरुनगर येथील जिल्हा क्रीडांगणावर आयोजित जिल्हास्तरीय विद्याभारती क्रीडा स्पर्धेच्या बक्षीस वितरणप्रसंगी प्रमुख पाहुणे अस्मिता एंटरप्रायझेसचे संचालक राजेश लोहार, विद्याभारतीचे परशराम मंगनाईक, ऍड. चेतन मणेरीकर, वसंत सोनोवलकर, भाग्यश्री देसाई, सी. आर. पाटील, चंद्रकांत तुर्केवाडी यांच्या हस्ते विजेत्या संघांना चषक, प्रमाणपत्र, खेळाडूंना पदके देवून गौरविण्यात आले.
ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी नीरज चव्हाण, गौतम तेजम, धनसिंग धनाजी, शंकर कोलकार, बापू देसाई, ओमकार गावडे, प्रशांत वाडकर, मंजुळा तळवार, भाग्यश्री यश पाटील, अश्विनी लोहार, निधी कदम, सानिका माळवी, सुजल मलतवाडी, पृथ्वीराज शिंदे यांनी विशेष परिश्रम घेतले.