प्रतिनिधी/ बेळगाव
शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानतर्फे प्रतिवर्षाप्रमाणे यावर्षीही घटस्थापनेपासून दसऱ्यापर्यंत नवरात्रोत्सवात भव्य दुर्गामाता दौड काढली जाणार आहे. दुर्गामाता दौडची रूपरेषा ठरविण्यासाठी सोमवार दि. 2 रोजी बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. सायंकाळी 5 वाजता अनसूरकर गल्ली येथील छत्रेवाड्यात बैठक होणार आहे.
यावर्षी बेळगावच्या दुर्गामाता दौडचे 25 वे वर्ष असून भव्यदिव्य दौड काढली जाणार आहे. गणेशोत्सवानंतर आता युवावर्गाला दुर्गामाता दौडची उत्सुकता लागली असून आतापासूनच तयारीला सुरुवात करण्यात येत आहे. सोमवारी होणाऱ्या बैठकीला मोठ्या संख्येने कार्यकर्ते, धारकरी तसेच गावप्रमुख, विभाग प्रमुखांनी उपस्थित राहावे, असे आवाहन कर्नाटक प्रांतप्रमुख किरण गावडे यांनी केले आहे.









