लोणावळा / वार्ताहर :
लोणावळा शहरात स्विमिंगपूलमध्ये बुडून मृत्यू होण्याच्या घटनांत वाढ झाली आहे. जुना खंडाळा भागातील एका खासगी बंगल्यात मंगळवारी रात्री उशिरा निखिल संपत निकम (वय 22, रा. चिंचवड) हा पर्यटक तरुण स्विमिंगपूल मध्ये बुडून मयत झाला. या घटनेची खबर निखिल याचा चुलत भाऊ विशाल निकम याने लोणावळा शहर पोलीस ठाण्यात दिली. पोलीस ठाण्यात याप्रकरणी अकस्मात मयत दाखल करण्यात आले आहे.
निखिल व त्याचे काही मित्र लोणावळ्यात मित्राचा वाढदिवस साजरा करण्यासाठी आले होते. ते ज्या बंगल्यात थांबले होते, तेथेच मंगळवारी रात्री उशिरा स्विमिंगपूल मध्ये निखिल बुडाला. त्याला मित्रांनी लोणावळय़ातील खासगी रुग्णालयात आणले असता, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या घटनेची माहिती समजताच लोणावळा शहरचे पोलीस निरीक्षक सिताराम डुबल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक मुजावर व पथक घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी घटनेची माहिती घेतली असून, पुढील तपास सुरु केला आहे.
अधिक वाचा : तिढा सुटला; महावितरणचा संप अखेर मागे