भारत मोठी सागरी शक्ती होण्याप्रकरणी डोवालांचे उद्गार
वृत्तसंस्था /नवी दिल्ली
सागरी सुरक्षेच्या महत्त्वाचा उल्लेख करत राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी भारताचा ‘टाइम’ (वेळ) येणार असल्याचे म्हटले आहे. आम्हाला एक राष्ट्र म्हणून मजबूत व्हावे लागेल, यात किनारी आणि सागरी सुरक्षा अत्यंत महत्त्वाची भूमिका साकारणार असल्याचे डोवाल यांनी भू-सीमा आणि सागरी सीमेच्या वेगवेगळय़ा आव्हानांचा उल्लेख करत नमूद केले आहे. दिल्लीत मल्टीएजेन्सी मेरिटाइम सिक्युरिटी ग्रूपची पहिली बैठक सुरू असून डोवाल यांनी याचा शुभारंभ केला आहे.
स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच अशाप्रकारचे संयुक्त प्रयत्न झाले आहेत. स्टेट मेरिटाइम सिक्युरिटी कॉर्डिनेटर जलदपणे काम करत आहेत. सागरी सुरक्षेत भारतीय नौदलाचे सहाय्य अत्यंत महत्त्वपूर्ण आहे, कारण सागरी सुरक्षेची जबाबदारी नौदलाकडे आहे. भूसीमेवर अधिक लक्ष राहिले आहे, परंतु ते केवळ भूसीमेवर अधिक युद्ध लढले गेल्यामुळे नव्हे. तर भू आणि सागरी सीमेत मोठा फरक देखील आहे. भूसीमेप्रमाणे सागरी सीमेवर कुंपण घालता येत नाही. सागरी सीमेवरत घुसखोरीवरून झिरो पर्संट टॉलरन्स देखील शक्य नसल्याने आम्हाला तंत्रज्ञान आणि अन्य मार्ग अवलंबवावे लागत असल्याचे डोवाल म्हणाले.
जमिनीवर सार्वभौमत्वाची संकल्पना क्षेत्रीय आहे, परंतु समुद्रात सार्वभौमत्वाची संकल्पना वेगवेगळी आहे. काही भाग पूर्णपणे आमच्या हद्दीत असतात आणि जलक्षेत्रात पुढे जाऊ लागल्यावर ईईझेड (एक्सक्लुझिव्ह इकॉनॉमिक झोन) आणि त्याहून पुढे गेल्यास तेथे अधिकार आणि जबाबदार स्पष्टपणे ठरविण्यात आली आहे. भूसीमेवर होणारे वाद हे द्विपक्षीय असतात. दोन दोन एकत्र येत यावर चर्चा करू शकतात. परंतु सागरी सीमेचा वाद हा बहुपक्षीय होताहे. समुद्राचे कायदे द्विपक्षीय नाहीत. कुठलाही देश सागरी क्षेत्रात मनमानीपणे निर्णय घेऊ शकत नसल्याचे डोवाल यांनी म्हटले आहे.
अधिक खर्च करण्याची गरज
आमचे सामरिक हितसंबंध आहेत आणि भूराजकीय हितसंबंध देखील आहेत. भारताकडे युनिक मेरीटाइम ऍडव्हान्टेज आहे. हिंदी महासागर क्षेत्रात भारत सर्वात मोठा देश आहे. भारताचे मध्यवर्ती स्थान अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावतो. 1300 हून बेटे असून जागतिक व्यापारी मार्ग हिंदी महासागर क्षेत्रातूनच जातो. आमच्या देशाच्या एकूण व्यापारापैकी 90-95 टक्के व्यापार सागरीमार्गाने होतो. 7 महत्त्वाचे सागरी शेजारी देश आमच्यासाठी महत्त्वाचे घटक आहेत. त्यांच्या अडचणींचा प्रभाव आमच्यावरही पडतो. अंतराळ आणि समुद्रात तंत्रज्ञानावर अधिक गुंतवणूक करण्याची गरज आहे. सागरी धोक्यात चाचेगिरी, अमली पदाथं तसेच मानवी तस्करीचा पैलू सामील असल्याचे ते म्हणाले.
स्वरुप बदलतेय
हिंदी महासागर क्षेत्रात भूराजकीय दृश्य बदलत आहे. पूर्वी हा ओशन ऑफ पीस होता, परंतु आता तो बदलतोय. समुद्रात आता आंतरराष्ट्रीय विरोधक आहेत, स्पर्धा अन् स्वतःच्या हितसंबंधांवरून संघर्ष आहे. आमच्या स्वतःच्या सागरी शेजारी देशांवरून जबाबदाऱया देखील आहेत. पूर्वी या दिशेने काम झाले नाही असे नाही, परंतु आव्हानाच्या तुलनेत हे काम कमी झाले. 26/11 हल्ला एक मोठे आव्हान होते, ज्यानंतर एनएमएससी (नॅशन मेरीटाइम सिक्युरिटी कॉर्डिनेटर) निर्माण करण्याच्या प्रक्रियेला वेग आला. एकत्र काम करण्यासाठी कॉमन एसओपी तयार करण्याची गरज आहे. सागरी महासत्ता म्हणून भारतही प्रस्थापित होणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
पहिली बैठक महत्त्वपूर्ण मल्टी एजेन्सी मेरिटाइम सिक्युरिटी ग्रूपची ही पहिली बैठक महत्त्वपूर्ण आहे. यात सर्व स्तरावर समन्वयावरून धोरणासंबंधी विचारविनिमय होणार आहे. बैठकीचे अध्यत्व नॅशनल मेरीटाइम सिक्युरिटी कॉर्डिनेटर व्हाइस ऍडमिरल अशोक कुमार (निवृत्त) करत आहेत. या ग्रूपमध्ये अनेक केंद्रीय मंत्रालये, यंत्रणा आणि सागरी मुद्दय़ांना हाताळणाऱया सुरक्षा दलांच्या प्रतिनिधींसह 13 किनारी राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांचे मेरिटाइम सिक्युरिटी कॉर्डिनेटर सदस्य आहेत. बैठकीत नौदल प्रमुख देखील सामील झाले आहेत.









