आपल्या पक्षाला आता राष्ट्रिय दर्जा मिळाला असून सत्ताधारी आपल्याला कोंडीत पकड्यासाठी पक्षाच्या नेत्यांना तुरुंगात टाकू शकतात. त्यामुळे आता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आता तुरुंगात जाण्यासाठी आपली मानसिकता केली पाहीजे असा इशारा आपल्या नेत्यांना देऊन सत्ताधारी भाजपला एक प्रकारे टोमणा हाणला आहे.
अरविंद केजरिवाल यांच्या आम आदमी पक्षाला निवडणुक आयोगाने राष्ट्रिय पक्षाचा दर्जा दिला. गुजरात विधानसभेच्या निवडणुकिच्या आकडेवारीनंतर निवडणुक आयोगाने हा निर्णय दिला आहे. त्यानंतर पक्षाचे अध्यक्ष आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आपल्या कार्यकर्त्यांच्य़ा बैठकित बोलताना म्हटले आहे कि, “’आप’ला इतक्या कमी कालावधीत राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळणे हा चमत्कारापेक्षा कमी नाही. देशातील कोट्यवधी लोकांच्या आशा आता आम आदमी पक्षावर आहेत. पक्षावर जनतेने मोठी जबाबदारी दिली असून परमेश्वराच्या आशीर्वादाने आम्ही ही जबाबदारी पूर्ण प्रामाणिकपणे पार पाडू.” असे केजरीवाल यांनी म्हटले आहे.
सोमवारी निवडणूक आयोगाने ‘आप’ला राष्ट्रीय पक्षाची मान्यता दिली. केजरीवाल यांनी पक्ष कार्यालयात जाऊन पक्षाचे नेते आणि कार्यकर्त्यांसोबत याचा आनंद साजरा केला.
आपल्या कार्यकर्त्यांना संबोधित करताना केजरीवाल म्हणाले, “आपच्या नेत्यांनी आणि कार्यकर्तांनी आता तुरुंगात जाण्यास तयार राहिले पाहीजे. कारण आपला पक्ष भाजपसारख्या राष्ट्रीय पक्षाविरुद्ध लढत आहे.”
पुढे बालताना त्यांनी “विसरू नका कि प्रामाणिकपणा, देशभक्ती आणि मानवता हे ‘आप’च्या विचारसरणीचे तीन स्तंभ आहेत,” असे बोलून केजरीवाल यांनी आप समर्थकांना आपच्या विचारधारेची आठवणही करून दिली.








