Ottawane-Gawliwadi new 100 KV transformer should be provided
ग्राहकांसह शेतकरी व बागायतदारांची मागणी
ओटवणे गवळीवाडी येथील कमी क्षमतेचा तसेच जीर्ण झालेल्या ट्रान्सफार्मरमुळेग्राहकांसह शेतकरी व बागायतदारांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत असून या ठिकाणी त्वरीत नवीन १०० केव्हिचा ट्रान्सफार्मर द्यावा अशी मागणी गवळीवाडी ग्रामस्थांनी कंपनीचे कनिष्ठ अभियंता श्री बोत्रे यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली.
जीर्ण झालेल्या या कमी क्षमतेच्या या ट्रान्सफार्मरमुळे विद्युत उपकरणे चालत नाहीत तसेच मोटर पंप यांनाही आवश्यकता क्षमतेचा वीज पुरवठा होत नसल्याने पंप सुरू होत नाहीत. पर्यायाने ग्राहकांसह शेतकरी व बागायतदारांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. त्यामुळे वीज वितरण कंपनीने याची तात्काळ दखल घेऊन या ठिकाणी त्वरीत नवीन १०० केव्हिचा ट्रान्सफार्मर बसवावा अशी मागणी केली आहे.
यावेळी महाराष्ट्रीय यादव चॅरिटी ट्रस्टचे सिंधुदुर्ग जिल्हा अध्यक्ष दशरथ शृंगारे, ग्रामपंचायत सदस्य प्रशांत बुराण, अरूण बोरये, एकनाथ बोरये, संजय गावकर, गजानन चिले आदी गवळीवाडीतील ग्रामस्थ उपस्थित होते.
ओटवणे प्रतिनिधी