रविना टंडनने व्यक्त केले मत
बॉलिवूडमध्ये अभिनेत्यांच्या तुलनेत अभिनेत्रींना कमी लेखले जाते. अभिनेत्यांच्या तुलनेत अभिनेत्रींना कमी मानधन दिले जाते. अभिनेत्री रविना टंडनने आता अभिनेत्रींच्या मानधनाविषयी स्वतःचे विचार मांडले आहेत.

चित्रपटसृष्टीत पुरुषांच्या तुलनेत महिला कमी पैसे कमावित असल्या तरीही ओटीटी प्लॅटफॉर्म आणि टीव्हीक्षेत्रात महिला कलाकारांनी स्वतःचे स्थान निर्माण केले आणि या महिला कलाकारांना अभिनेत्यांच्या तुलनेत अधिक रक्कम मिळत आहे. चित्रपटसृष्टीने ओटीटी आणि टीव्हीक्षेत्राकडून शिकण्याची गरज आहे. ओटीटीवर महिलांवर आधारित कंटेंट तयार होत आहेत तसेच महिलांना अधिकाधिक मानधन दिले जातेय. ओटीटीवर महिला कलाकार उत्तम कामगिरी करत असल्याचे रविनाने म्हटले आहे.
चित्रपटसृष्टीत निर्माते आणि दिग्दर्शकांमध्ये पुरुषांचे प्रमाण अधिक आहे. तर ओटीटीवर महिला देखील निर्मात्या आहेत. या महिलांकडून उत्तम कंटेंट तयार केला जात असून मुख्य कलाकार म्हणून महिलांचीच निवड करत आहेत. यामुळे ओटीटीवर अभिनेत्रींना अधिक संधी मिळत असल्याचे रविनाने म्हटले आहे.
अभिनेत्री रविना टंडनने ‘अरण्यक’ या वेबसीरिजद्वारे ओटीटीवर पदार्पण केले होत. यातील स्वतःच्या अभिनयाने रविनाने प्रेक्षकांची मने जिंकली होती. तर रविना यापूर्वी ‘केजीएफ 2’ या चित्रपटात दिसून आली होती. अभिनेत्री लवकरच ‘घुडचढी’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.









