वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
सेल्युलर ऑपरेटर्स असोसिएशन ऑफ इंडिया (सीओएआय) ने असे सुचवले आहे की, व्हॉट्सअॅप आणि टेलिग्रामसारख्या ओव्हर-द-टॉप (ओटीटी) कम्युनिकेशन अॅप्सना नेहमीकरीता मोबाइल सिमसह जोडणे ‘अनिवार्य’ असावे.
सीओएआयने म्हटले आहे की, हे पाऊल सायबर फसवणूक रोखण्यास आणि राष्ट्रीय सुरक्षा मजबूत करण्यास मदत करणार आहे. सध्या ओटीटी कम्युनिकेशन अॅप वापरकर्त्याच्या डिव्हाइसशी फक्त एकदाच कनेक्ट करावे लागते, डिव्हाइसवरील सेवा नोंदणी प्रक्रिये दरम्यान. ज्या सिम कार्डसह खाते नोंदणीकृत होते ते डिव्हाइसमधून काढून टाकल्यानंतर, बदलल्यानंतर किंवा पूर्णपणे निक्रिय केल्यानंतरही ओटीटी कम्युनिकेशन अॅप काम करत राहते.









