कोल्हापूर : शिवसैनिकांनी भाडोत्री लोकांकडून प्रतिज्ञापत्रे भरली या खासदार संजय मंडलिक यांच्या वक्तव्याचा शिवसैनिकांकडून बिंदू चौकात निषेध करण्यात आला. “शिवसेनाप्रमुखांच्या आदेशाने आणि सामान्य शिवसैनिकांमुळे विश्वासघातकी संजय मंडलिक खासदार झाले. शिवसैनिकांनी सादर केलेली प्रतिज्ञापत्रे भाडोत्री म्हणणाऱ्या संजय मंडलिकांना एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या खोक्यामुळे शिवसैनिकांचा विसर पडला आहे.” असे बोलून यापुढे संजय मंडलिकांकडून शिवसैनिकांचा अनादर झाला तर तर मंडलिकांना कोल्हापूर जिल्ह्यात सळो कि पळो करून सोडल्या शिवाय राहणार नाही. असा इशारा शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विजय देवणे यांनी खासदार संजय मंडलिक यंनी केला.
पुढे बोलताना ते म्हणाले “संजय मंडलिक हे काय निवडणूक आयोग नाहीत. प्रतिज्ञापत्राबाबत पलिसांकडून तपास सुरू आहे. ही प्रतिज्ञापत्रे आधारकार्ड आणि फोटोसह दिली गेली असून त्यांची नोटरी केली गेली आहे. त्यामुळे तपासयंत्रणेला शिवसेना मदत करत असून महाराष्ट्रात अशा प्रकारचे निच राजकारण शिंदे गटाकडून केले जात आहे.” असे म्हणत शिवसैनिकांनी सादर केलेली प्रतिज्ञापत्रे गोळा करण्यासाठी शिंदे गटाकडे कार्यकर्ते नाहीत.असा टोला त्यांनी लगावला.
शेवटी त्यांनी शिवसेनेला मिळालेली मशाल हे चिन्ह सोशल मीडीयाच्या माध्यमातून २ कोटी लोकांपर्यंत हे चिन्ह पोहोचवणार असल्याचे सांगितले. या चिन्हाला मिळालेली लोकप्रियता नसून शिंदे गटाच्या उताराची सुरवात आहे. त्यामुळे शिंदे गटातील लोकांच्या पायाखालची वाळू घसरली आहे. असेही ते म्हणाले.