इस्रायलची कारवाई : गाझामधील युद्धावर माहितीपटाची केली होती निर्मिती
वृत्तसंस्था/ जेरूसलेम
ऑस्कर विजेते पॅलेस्टिनी चित्रपट दिग्दर्शक हमदन बल्लाल यांना इस्रायलच सैन्याने ताब्यात घेतले आहे. याची माहिती त्यांचे सह-दिग्दर्शक युवल अब्राहम यांनी दिली आहे. काही इस्रायली लोकांनी वेस्ट बँक परिसरात हमदन यांना मारहाण केली असून ते यात जखमी झाले आहेत असे युवल यांनी सांगितले.
हमदन यांनी रुग्णवाहिका बोलालिवी असता इस्रायलच्या सैनिकांनी ती रोखली आणि हमदन यांना ताब्यात घेतला. त्यानंतर हमदन यांच्या ठावठिकाण्याबद्दल कुठलीच माहिती मिळाली नसल्याचा दावा युवल यांनी केला.
हमदन आणि युवल यांनी मिळून ‘नो अदर लँड’ हा माहितीपट तयार केला होता. या माहितीपटाला यंदाचा ऑस्कर मिळाला आहे. हा माहितीपट इस्रायल आणि गाझादरम्यान सुरू असलेल्या संघर्षादरम्यान दोन्ही बाजूच्या दोन मित्रांची कहाणी सांगणारा आहे. या माहितीपटाने आणखी अनेक आंतरराष्ट्रीय पुरस्कार पटकाविले आहेत.









