वृत्तसंस्था / बहरीन
2025 च्या एफ-1 ग्रा प्रि मोटार रेसिंग हंगामातील रविवारी येथे होणाऱ्या बहरीन ग्रा प्रि मोटार शर्यतीच्या शनिवारी झालेल्या सराव सत्रामध्ये मॅक्लेरेन चालक ऑस्कर पिसेट्रीने पोल पोझिशन पटकाविले.
पिसेट्रीच्या वैयक्तिक रेसिंग कारकिर्दीतील ही 50 वी एफ-1 शर्यत आहे. शनिवारी झालेल्या सराव सत्रामध्ये पिसेट्रीने आपल्याच संघातील सहकारी लेंडो नॉरिसला मागे टाकले. ऑस्ट्रेलियाच्या पिसेट्रीने चालु वर्षीच्या रेसिंग हंगामात पहिल्या चार शर्यतीत पोल पोझिशन पटकाविले होते. पिसेट्रीने सराव सत्रामध्ये 15.499 सेकंदाचा अवधी घेत अग्रस्थान मिळविले. एफ-1 मोटार रेसिंग सर्वंकश गुणतक्त्यात नोरीसने 77 तर पिसेट्रीने 74 गुण नोंदविले आहेत.









