वृत्तसंस्था / ब्रुसेल्स
2025 च्या एफ-1 मोटार रेसिंग हंगामातील येथे रविवारी होणाऱ्या बेल्जियम ग्रा प्री एफ-1 मोटार शर्यतीच्या शनिवारी झालेल्या सराव सत्रात ऑस्ट्रेलियाच्या ऑस्कर पियास्ट्रीने पोल पोझिशन पटकाविले.
शनिवारी सराव सत्रामध्ये एफ-1 शर्यतीच्या सर्वंकश गुणतक्त्यात आघाडीवर असलेल्या पियास्ट्रीने मॅक्स व्हर्स्टेपनला तसेच आपला मॅक्लरेन संघातील सहकारी व प्रमुख प्रतिस्पर्धी लँडो नोरीसला मागे टाकले. नोरीसला या सराव सत्रामध्ये तिसऱ्या स्थानावर तर रेडबुल चालक आणि या स्पर्धेतील विद्यमान विजेत्या मॅक्स व्हर्स्टेपनला दुसऱ्या स्थानावर समाधान मानावे लागले. पियास्ट्रीने या सराव सत्रात 1 मिनिट, 40.510 सेकंदाचा अवधी घेत व्हर्स्टेपनला 0.477 सेकंदांनी मागे टाकले. फेरारी चालक चार्लर लेकलिरेक चौथ्या स्थानावर राहीला.









