वृत्तसंस्थना / वुहान (चीन)
डब्ल्यूटीए टूरवरील येथे सुरू झालेल्या 1000 दर्जाच्या वुहान महिलांच्या आंतरराष्ट्रीय टेनिस स्पर्धेत जपानची नाओमी ओसाका तसेच सोफीया केनिन यांनी विजयी सलामी दिली.
मंगळवारी झालेल्या पहिल्या फेरीतील सामन्यात जपानच्या ओसाकाने कॅनडाच्या लैला फर्नांडीझचा 4-6, 7-5, 6-3 असा पराभव करत दुसऱ्या फेरीत प्रवेश केला. 2017 नंतर पहिल्यांदाच ओसाकाने या स्पर्धेत आपला सहभाग दर्शविला आहे. दुसऱ्या एका सामन्यात सोफीया केनिनने अॅनेस्टेशिया झाकारोव्हाचा 3-6, 7-6 (7-5), 6-3, सोळाव्या मानांकीत लुडमिला सॅमसोनोव्हाने अॅरेंगोचा 6-1, 7-5 असा पराभव करत दुसऱ्या फेरीत स्थान मिळविले. या स्पर्धेत एम्मा राडुकानुने पहिल्या फेरीच्या सामन्यातील दुसऱ्या सेटमधून माघार घेतल्याने अॅन ली हिला पुढील फेरीत स्थान मिळाले आहे.









