वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
ऊर्जा क्षेत्रातील कंपनी टोरेंट पॉवर भारतात ऊर्जा प्रकल्पासाठी 22 हजार कोटी रुपये गुंतवणार असल्याची माहिती आहे. सदरचा कंपनीचा ऊर्जा पुरवठा प्रकल्प 1600 एमडब्ल्यू क्षमतेचा कोळशावर आधारीत मध्य प्रदेशात असणार आहे. टोरेंट समुहात पाहता टोरेंट पॉवरची 22 हजार कोटींची ही गुंतवणूक सर्वाधिक गुंतवणूक मानली जात आहे. सरकारच्या 80 गिगॅवॅट ऊर्जा उत्पादनाचे लक्ष्य साध्य करण्याच्या प्रयत्नामध्ये टोरेंट पॉवरचा हा वाटा महत्त्वाचे योगदान देणारा असणार आहे. वरील उद्दिष्ट 2032 पर्यंत साध्य करण्याचे निश्चित करण्यात आले आहे.
8 ते 10 हजार जणांना मिळणार रोजगार
ऊर्जा निर्मितीसाठी आवश्यक असणाऱ्या कोळशाचा पुरवठा मध्य प्रदेश व कोळसा मंत्रालयाअंतर्गत कंपनीला प्रकल्पासाठी पुरवठा केला जाणार आहे. सदरचा नवा प्रकल्प कार्यान्वीत होण्यासाठी 72 महिन्याचा अवधी लागणार असल्याचेही समजते. नव्या प्रकल्पाच्या अंमलबजावणीनंतर 8 हजार ते 10 हजार उमेदवारांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत.









