परग्रहवासी, अर्थात एलियन्स आपल्याला दिसते आहेत, असा दावा अनेकजणांनी केला आहे. हे परग्रहवासी दिसायला मानवापेक्षा वेगळे आहेत. ते मानवापेक्षा प्रगत आहेत. ते उडत्या तबकड्यांमध्ये बसून शेकडो प्रकाशवर्षांचा प्रवास करुन पृथ्वीवर येतात, असा समज दृढ आहे. वैज्ञानिकांना मात्र तो मान्य नाही. परग्रहवासीयांना पहिल्याच्या कथा केवळ बाता तरी आहेत, किंवा काहीजणांना तसा भ्रम होतो, असे वैज्ञानिकांचे म्हणणे असते. कोणताही सजीव इतका दूरचा प्रवास करणे अशक्य कोटीतील आहे, असे ते स्पष्ट करतात.

तथापि, परग्रहवासीयांचे या अथांग विश्वात नेमके कोठे वास्तव्य आहे, याचा शोध लागल्याचा दावा आता प्रत्यक्ष शास्त्रज्ञांनीच केल्याचे वृत्त आहे. पृथ्वीपासून हजारो प्रकाशवर्षे दूर असलेल्या एका ग्रहावर त्यांचे वास्तव्य आहे. हा ग्रह सूर्यमालेतील युरेनससारखा आहे. त्यावर वातावरण असून त्या वातावरणात टिकाव धरणाऱ्या सजीवांची तेथे निर्मिती झाली. कालांतराने या सजीवांमध्ये उत्क्रांती होऊन माणसापेक्षाही प्रगत अशी प्रजाती निर्माण झाली. हेच ते परग्रहवासी किंवा एलियन्च्स असा दावा काही खगोल शास्त्रज्ञांनी केला आहे. पण इतके अंतर पार करुन ते येथे येतात कसे, हा प्रश्न आहे. वैज्ञानिक म्हणतात, की ते पृथ्वीवर येत नाहीत. याचाच अर्थ असा, की विश्वाच्या सीमेच्या आसपास कोठेतही मानवासारखे सजीव असणारा ग्रह आहे. पण येथे येणारे ते हे एलियन्स नाहीत. ती केवळ एक कल्पनाच आहे, असेही स्पष्टीकरण संशोधकांनी या संदर्भात केले आहे.
थोडक्यात, पृथ्वीवर आहे तशी जीवसृष्टी आणि प्रगत मानव अन्य ग्रहांवरही आहेत. तशा एका ग्रहाचे अस्तित्व आता माणसाला गवसले आहे. अर्थात, तेथपर्यंत पोहचणे हे अशक्य आहे. तसेच त्यांनी येथे येणेही तितकेच अशक्य आहे. तेथून येणारे सिग्नल्सही येथे स्वीकारणे आणि त्यांचे डीकोडिंग करणेही शक्य नाही. पण पृथ्वी या विश्वात ‘पोरकी’ नाही, एवढे निश्चित असे काही संशोधकांचे म्हणणे आहे. अर्थात, या संशोधनाच्या सत्यतेला विरोध करणारे संशोधक आहेतच. त्यामुळे सर्वसामान्य माणसाच्या हाती केवळ अशी वृत्ते वाचणे आणि त्यावर चर्चा करणे एवढेच आहे. अंतराळ हा इतका गहन प्रकार आहे, की निश्चित असे काही सांगता येणे संशोधकांनही शक्य नसते. पण काही ठोकताळे मांडले जातात.









