विविध कार्यक्रमांचे आयोजन
प्रतिनिधी
बांदा
मडूरा विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटीचा अमृत महोत्सव शनिवार २३ डिसेंबर रोजी साजरा होत आहे. त्यानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी ८ वाजता सत्यनारायण महापूजा, ११ वाजता सहकार सेवा केंद्राचे उद्घाटन सिंधुदुर्ग जिल्हा बँक चेअरमन मनीष दळवी यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी जिल्हा उपनिबंधक माणिक सांगळे, सावंतवाडी माजी नगराध्यक्ष संजू परब, जिल्हा बँक संचालक विद्याधर परब, महेश सारंग, रवींद्र मडगावकर, गजानन गावडे, माजी संचालक प्रमोद कामत, गुरुप्रसाद नाईक, सावंतवाडी तालुका खरेदी विक्री संघाचे चेअरमन प्रमोद गावडे, मडूरा पतसंस्थेचे चेअरमन सुरेश परब, मडूरा सरपंच उदय चिंदरकर, रोनापाल सरपंच योगिता केणी, निगुडे सरपंच लक्ष्मण निगुडकर, पाडलोस सरपंच सलोनी पेडणेकर, कास सरपंच प्रवीण पंडित, पाडलोस सोसायटी चेअरमन तुकाराम शेटकर, कास सोसायटी चेअरमन सत्यवान पंडित, निवृत्त गटसचिव रमेश गावकर उपस्थित राहणार आहेत.यावेळी सोसायटी माजी संचालक, कर्मचारी व विशेष योगदान देणाऱ्या नागरिकांना सन्मानित करण्यात येणार आहे. दुपारी महाआरती, तीर्थप्रसाद व महाप्रसाद होईल. सायंकाळी ७ वाजता बुवा संतोष जोईल व व्यंकटेश नर यांच्यात डबलबारी भजनाचा सामना रंगणार आहे. सर्व शेतकरी सभासद व हितचिंतकांनी कार्यक्रमांचा लाभ घ्यावा, असे आवाहन चेअरमन ज्ञानेश परब यांनी संचालक मंडळाच्या वतीने केले आहे.









