मालवण / प्रतिनिधी
मालवणमधील आस्था ग्रुप आणि कै.अरुण काशिनाथ बादेकर चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने बुधवार दिनांक १३ ऑगस्ट रोजी सकाळी ९:३० वाजता रेवतळे प्राथमिक शाळा येथे देशभक्तीपर समूह गीत गायन स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.ही स्पर्धा १० वी पर्यंतच्या शालेय विद्यार्थ्यांसाठी खुली आहे.प्रथम विजेत्या तीन क्रमांकाना अनुक्रमे ३००१, २००१ आणि १००१ रुपये, चषक आणि प्रमाणपत्रे दिली जातील.प्रत्येक संघात वादकांसह कमीत कमी ७ आणि जास्तीत जास्त १५ मुले सहभागी असावीत . समुह गीत सादर करण्यासाठी १० मिनिटे कालावधी दिला जाईल.इच्छुक संघांनी सौगंधराज बादेकर यांच्याकडे ९४२००२२८९० या क्रमांकावर आपली नावे नोंदवावीत असे आवाहन आस्था ग्रुप अध्यक्ष उमेश मांजरेकर, सचिव मनोज चव्हाण आणि चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष गणेश बादेकर यांनी केले आहे.
Previous Articleअंत्रोळी–कंदलगाव परिसरात तीन जनावरांचा विषबाधेने मृत्यू
Next Article निवृत्त पोलीस उपनिरीक्षकास लाचप्रकरणी सक्तमजुरी









