नंदगड येथे दुर्गादौडीची सांगता
वार्ताहर/नंदगड
छत्रपती शिवाजीराजानी हिंदवी स्वराजाची स्थापना केली. ते अबाधित ठेवणे प्रत्येक हिंदूचे कर्तव्य आहे. हिंदू धर्माबरोबरच आपली संस्कृती टिकविणे महत्त्वाचे आहे. देहाकडून देवाकडे जाण्यासाठी मध्ये देश लागतो. या देशासाठी आपण काहीतरी केले पाहिजे. त्यासाठी देव, धर्म आणि देश महत्त्वाचे आहे. भारतमातेच्या पायावर पाणी घातले पाहिजे. तरच दौडीचा उद्देश सफल होणार असल्याचे आवाहन प्रा. साक्षी पाटील बेळगाव यांनी केले. नंदगड येथील दुर्गादौडीची सांगता मठ गल्लीत झाली. यावेळी चन्नवीर मठाचे स्वामी चन्नवीर देवरु, अरव यळळूरकर, गौतमी पाटील, शिवाजी पाटील, गणेश भुत्तेवाडकर आदीनी विचार मांडले. याप्रसंगी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.









