हॉटेलचे दरवाजे आपोआप होत आहेत खुले
लास व्हेगासचे सर्वात जुने आणि हॉन्टेड ठिकाण म्हटले जाणारे एक हॉटेल भूत पकडण्याची स्पर्धा आयोजित करणार आहे. यात हॉटेलच्या आत भूत असल्याचा पुरावा शोधून काढणाऱ्या शूर इसमाला 4 लाख रुपयांपेक्षा अधिक रक्कम इनामादाखल दिली जाणार आहे. या आव्हानासाठी रोमांच इच्छिणाऱ्यांना एल कॉर्टेज हॉटेल आणि कॅसिनोच्या आत भूतांची शिकार करण्याची संधी मिळेल. याच्या अंतर्गत हॉटेल आणि कॅसिनोमध्ये एक विकेंड घालवावा लागेल. अशाप्रकारचा रोमांच इच्छिणारे शूर लोक या स्पर्धेसाठी अर्ज करू शकतात.
या स्पर्धेत केवळ एक विजेता निवडला जाणार आहे. जेथे या स्पर्धेचे आयोजन होत आहे, ते व्हेगासमध्ये सर्वाधिक काळापर्यंत चालणारे हॉटेल पॅसिनो आहे. याचे नाव एल कॉर्टेज असून ते फ्रेमोंट स्ट्रीटवर आहे. याला ओल्ड स्ट्रिप किंवा ओल्ड वेगास देखील म्हटले जाते.
हे हॉटेल 1941 साली सुरू झाले होते, या जुन्या काळातील हॉटेलने आणि फ्रेमोंटच्या अन्य हॉटेल्सनी देखील 1941 पासून आतापर्यंत खूप काही पाहिले आहे. यात हत्या, टोळीयुद्ध आणि भूताटकीयुक्त घटनाही सामील आहेत. 84 वर्षे जुन्या या हॉटेलमध्ये अनेक पाहुण्यांना काही भीतीदायक गोष्टी दिसल्या आणि ऐकण्यास मिळाल्याचे बोलले जाते. काळी आकृती दिसणे, पायाचे ठसे दिसणे, दरवाजे आपोआप खुले किंवा बंद होण्याच्या घटनांची नोंद आहे.
घोस्ट हंटर
स्पर्धेच्या तपशीलात घोस्ट हंटिंग टूल्स आणि उपकरणांनी युक्त केल्यावरच आत पाठविले जाईल, जेणेकरून या कहाण्या खऱ्या आहेत का हे कळू शकेल असे नमूद करण्यात आले आहे. या स्पर्धेसाठी निवडलेल्या घोस्ट हंटरना एका भीतीदायक विकेंडसाठी एल कॉर्टेजमध्ये चेक-इन करावे लागेल, जेथे कॅसिनोच्या सर्वात जुन्या आणि सर्वात भीतीदायक ठिकाणांवर जात भूतांचा शोध घेणे आणि भूताटकीयुक्त हालचालींच्या संकेतांना रिकॉर्ड करावे लागणार आहे. संबंधित इसमाला हॉटेलचा कॉरिडॉर, पॅसिनो फ्लोर आणि अन्य कुठल्याही अशा क्षेत्रात जाण्याचे काम सोपविले जाईल, जेथे भूत-प्रेत असल्याचा दावा केला जातो. तेथे भूतांचा शोध घेणारी उपकरणे म्हणजेच ईएमएफ मीटर, ईव्हीपी रिकॉर्डर आणि थर्मल सेंसरचा वापर केला जाईल, जेणेकरून रात्री असामान्य घडामोडींचा शोध लावता येईल.
6 ऑक्टोबरपासून सुरु
घोस्ट हंटिंग स्पर्धा 6 ऑक्टोबर ते 31 ऑक्टोबरपर्यंत चालणार आहे. जर एखादी भीतीदायक गोष्ट आढळल्यास घोस्ट हंटद्वारे पुराव्यासाठी फोटो आणि व्हिडिओ मिळविण्याची अपेक्षा करण्यात आली आहे. एल कॉर्टेजचे तळघर माजी कर्मचाऱ्यांची राख आणि दाह-अवशेषांनी भरलेले असल्याची अफवा आहे.









