प्रतिनिधी /बांदा
Organized various programs on the occasion of Shree Sant Sohirobanath self-realization day at Insuli!
इन्सुली डोबाशेळ येथील श्री संत सोहिरोबानाथ मंदिर येथे श्री संत सोहिरोबनाथ आत्मसाक्षात्कार दिनानिमित्त प्रतिवर्षीप्रमाणे विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन शुक्रवार दिनांक 5 मे रोजी करण्यात आले आहे. यानिमित्ताने सकाळी 6 वाजता काकड आरती, सकाळी 8.30वाजता श्रीच्या पादुकावर अभिषेक, सकाळी 9.30वाजता श्री सत्यनारायण महापूजा, दुपारी महाप्रसाद, सायंकाळी 5.30वाजता श्री संत सोहिरोबनाथ भजन मंडळ बांदा यांचे भजन, सायंकाळी 7 ते 8.30 पालखी सोहळा, रात्री ठीक 9.30 वाजता ओंकार पारंपरिक दशावतार नाट्यमंडळ वेंगुर्ले यांचा कुंकु झाले वैरी हा नाट्यप्रयोग होणार आहे. या कार्यक्रमाचे लाभ घेण्याचे आवाहन श्री संत सोहिरोबानाथ सेवा समिती व उत्कर्ष युवक कला क्रीडा व व्यायाम मंडळ इन्सुली यांच्या वतीने करण्यात आले आहे.









