प्रतिनिधी
बांदा
सावंतवाडी तालुका दशावतारी बहुउद्देशीय संघाच्या वतीने उद्या शुक्रवारी 1 सप्टेंबर रोजी इन्सुली येथील श्री देवी माऊली मंदिरात विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. यात सायंकाळी 4 वाजता दहावी , बारावी व विशेष नैपुण्य प्राप्त दशावतारी मुलांचा सत्कार सोहळा तसेच सावंतवाडी तालुक्यातील जेष्ठ दशावतारी कलाकारांचा सन्मान होणार आहे. तसेच सायंकाळी 6 वाजता सावंतवाडी तालुक्यातील संयुक्त दशावतार कलाकारांचा पिंडदान हा महान पौराणिक नाट्यप्रयोग होणार आहे. तरी सर्व नाट्यरसिकांनी या कार्यक्रमात सहभागी व्हावे असे आवाहन सावंतवाडी तालुका दशावतारी बहुउद्देशीय संघ यांच्या वतीने करण्यात आले आहे.









