प्रतिनिधी/ बेळगाव
तरुण भारतच्या ‘मी उर्जिता’तर्फे खास नाताळ अर्थात ख्रिसमसनिमित्त विविध स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत. यामध्ये ख्रिसमस गिफ्ट हॅम्पर, रिथ व क्रिब (ख्रिस्त जन्म देखावा) स्पर्धा घेण्यात येतील.
क्रीब स्पर्धेअंतर्गत स्पर्धकांनी क्रीब आपल्या घरीच तयार करावयाचा आहे. परीक्षक 25 ते 30 डिसेंबर दरम्यान प्रत्यक्ष पाहणी करतील. यासाठी आपला पत्ता आणि शुल्क भरलेली पावती 8095497664 या क्रमांकावर पाठवावी.
हॅम्पर करण्याच्या साहित्याचे मूल्य जास्तीतजास्त 1 हजारपर्यंत असावेत. रिथ मेकिंग स्पर्धा 23 रोजी होणार आहे. सर्व स्पर्धांची नोंदणी 21 डिसेंबरपर्यंत करता येईल. हॅम्पर व रिथ तयार करताना स्पर्धकाने त्याचे व्हिडिओ शुटींग करून तयार केलेली वस्तू हातात घेऊन त्याच तारखेचे तरुण भारत वृत्तपत्र दाखविणे बंधनकारक आहे. वृत्तपत्राची तारीख ठळक दिसणे आवश्यक आहे. आपण तयार केलेला व्हिडिओ प्रवेश शुल्क भरण्याची पावती व आपले लोकेशन 9743639916 या क्रमांकावर पाठवावे. नोंदणी शुल्क व अधिक माहितीसाठी प्रवीण जाधव 8095497664 या क्रमांकावर संपर्क साधावा.









